Skip to main content

Posts

Featured

तुझं जगणं.... तुझ्यासाठीच

 तुझं असणं.... तुझ्याचसाठी तुझं असणं तुझ्यासाठी असावं तुझं जगणं तुझ्यासाठी असावं तुझ्या मनानं तुझ्या मनाशीच आता नव्याने संधाण बांधाव लाख खेळू पाहतील लोक तुझ्या भावनांशी पण...  खेळणं बनायचं का नाही  हे त्यांनी नाही तर तू ठरवावं. आवडली एखादी गोष्ट  तर खुशाल दाद दे. आणि जी वाट रुचतच नाही मनाला तिथून खुशाल माघार घे. दुःखाला यायचं असेल आयुष्यात तर त्याच्या स्वागताला हसतमुखाने तयार रहा. आणि आनंदाच्या क्षणीही कधी उतू जाऊ देऊ नकोस तुझा सुखाने भरलेला झरा. पावलं म्हणतील नाच तेव्हा  एकटी तर एकटी ... नाचून घे. रडायची वेळ आलीच कधी तर आभाळ मोकळं होईपर्यंत बरसून घे. येणार नाहीच यश अलगद कवेत पण म्हणून चालायचं थांबवू नकोस. तुझ्या प्रत्येक पावलावर  स्थिर राहू दे तुझी नजर. प्रलोभन की प्रयत्न... एक वाट ठरवच तुझी तू. तुझ्या यशाचा सूर्योदय होणारी पूर्व दिशा तू. नको बाई अशी छोट्या छोट्या गोष्टी वर  अख्खं पान भरुन लिहू. एका एका शब्दासाठी  अख्ख्या  आयुष्याचं गाणं गावू. बघ जरा इकडं... किती छान सूर्योदय झालाय तू मात्र मावळतीच्या रंगांचाच अजुन साज अंगावर ल्यायलाय. उतरव ...

Latest Posts

काटा

आयुष्य